पुणे नागपूर प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. मुलांच्या शाळेला सुट्टी लागल्यामुळे पुणे नागपूर प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. लोक वारंवार पुणे नागपूर प्रवास करत आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई, सणासुदीचा हंगाम या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वे नागपूर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष गाडी 13 एप्रिल ते 15 जून पर्यंत दर शनिवारी आणि सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सोडणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी अकरा वाजून 25 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पुणे-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 14 एप्रिल ते 16 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी 19-04-2024 ते 14-06-2024 पर्यंत दर शुक्रवारी धावणार आहे.
नागपूर ते पुणे उन्हाळी विशेष गाडी 18-04-2024 ते 13-06-2024 पर्यंत दर गुरुवार धावणार आहे. तसेच ही रेल्वे वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाईन आणि उरळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पुणे-नागपूर-पुणे या विशेष प्लॅटफॉर्मवर ट्रेनला थांबायची मंजुरी देण्यात आली आहे. तरी पुणे – नागपूर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचा आनंद घ्यावा.