पुष्पा 2 च्या टीजरमध्ये सहा मिनिटांच्या सिनसाठी गेले ६० कोटी

पुष्पा-2 चा चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर रिलीज झाला आहे. यामधील टीझरने अनेकांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.पुष्पा 2 या चित्रपटाचं बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले असून ,या चित्रपटातील 6 मिनिटांच्या एका सीनसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केला आहे.हा सीन शूट करण्यासाठी जवळपास एक महिना लागला आहे.या चित्रपटाने जगभरातील संगीत हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला 60 कोटी रुपयांना विकले आहेत. स्टार माने तेलुगू सॅटेलाईटचे हक्क मिळवले असेही सांगितले जात आहे. पुष्पा -2 मध्ये अल्लू अर्जुनचा एकच गेटअप दिसला. पण त्याचा हा एक गेटअप इतका पॉवरफुल होता की, लोक सातत्याने ‘पुष्पा -2’ चा टीजर पाहत आहे.टीजरमध्ये अल्लू अर्जुनचा हा गेटअप एका धार्मिक उत्सवाशी जोडला गेला आहे, त्या गेटअप ला ‘तिरुपती गंगम्मा जतारा ‘ असे म्हटलं जातं. या चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ व एका फाइट सीन दाखवण्यात आला आहे ; जो 6 मिनीटांचा सीन आहे. याच सीनसाठी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 ला रिलीज होणार असून निर्मात्यांनी या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top