५४ वर्षांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण

8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे.आज होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरातील लोक उत्सुक आहेत, खरे तर हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल आणि गेल्या 54 वर्षांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल.संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे.आणि ते चार मिनिटे 9 सेकंद पूर्ण अंधार असेल, हा काळ मागील सूर्यग्रहणांपेक्षा बराच मोठा आहे. त्यामुळे या काळात नासाच्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करण्याचेही नियोजन केले आहे.

अमेरिकेतील विविध शहरांमध्ये सूर्यग्रहणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून ते पाहण्यासाठी लोकांनी बरीच तयारी केली आहे.सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे. कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बर्म्युडा, कोलंबिया, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, रशिया स्पेन या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे.तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण 1970 साली पडले होते.सूर्यग्रहण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी लागणार आहे.विज्ञनानुसार अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागणे.वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.


1 thought on “५४ वर्षांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण”

  1. Pingback: Biggest Explosion Ever of 2024 | The Northern Crown: A Star Ready to Burst - Fast News4U

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top